
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अॅप्पलचे सीईओ टीम कूक यांना इशारा दिलाय. अमेरिकेत विक्री होणारे आयफोन अमेरिकेतच तयार झाले पाहिजेत. ते भारत किंवा इतर देशात तयार झालेले नसावेत असं स्पष्टच ट्रम्प यांनी सांगितलं. तसंच अॅप्पलवर किमान २५ टक्के टॅरिफ लावू अशी धमकीही दिली आहे.