
Investing in Uncertainty: A Guide for Navigating Trump's Trade Policies
भूषण महाजन, अर्थबोध शेअर्स अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक
kreatwealth@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरलेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारतासह काही देशांवर ‘टेरीफचा’चा नवा बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली. ट्रम्प यांनी अचानक ‘एक्स’वर पोस्ट टाकून भारतासाठी २५ टक्के आयातशुल्काची घोषणा केली. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर रशियाकडून खनिज तेल घेतल्याबद्दल दंड करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ‘ट्रम्प टेरीफ’चे काही होवो, आपल्या तिमाही निकालांच्या प्रतवारीवर शेअर बाजाराची पुढील दिशा ठरेल, असे मी पूर्वीच म्हटले होते. या वेळीही ट्रम्प यांच्या ‘टेरीफ बॉम्ब’ने शेअर बाजाराला फार मोठ्या प्रमाणात धक्का दिला नाही. थोडक्यात, ‘सुंदर सपना टूट गया...?’ असे वाटत असतानाच, ‘... नहीं तो!’ असे उत्तर तूर्त तरी समोर आले.