
मकरंद विपट - ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट
टीव्हीएस मोटर्स ही दक्षिण भारतातील दुचाकी आणि तीन चाकी वाहने बनविणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. तिच्या उत्पन्नातील मोठा वाटा हा तीन चाकी वाहनांमधून येतो. गेल्या आर्थिक वर्षापासून कंपनीने दुचाकी वाहनेही निर्यात करायला सुरुवात केली आहे. या कंपनीच्या तांत्रिक आलेखाचा अभ्यास केल्यास असे दिसून येते, की कंपनीच्या शेअरने तांत्रिक आलेखावर (दैनिक आणि साप्ताहिक) तीन वेगवेगळे पॅटर्न तयार केले आहेत. हे पॅटर्न समजून घेण्यासाठी दैनिक आणि साप्ताहिक हे दोन्ही तक्ते पाहावे लागतील.