

Dynamic Asset Allocation
esakal
आपण कायम ऐकतो की, शेअर बाजार अस्थिर (व्होलाटाइल) आहे; पण ही अस्थिरता हेच तर त्याचे जिवंत असण्याचे प्रमाण आहे ना? बाजार परतावा (मार्केट रिटर्न), अपेक्षित परतावा (एक्स्पेक्टेड रिटर्न) आणि परताव्यांचे आवश्यक दर (रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न) यांचे नीट भान ठेवले आणि या परताव्यांतील फरक लक्षात घेतला, तर आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित करू शकतो.