Post Office Fast Delivery Service
ESakal
Sakal Money
Post Office Service: आता पोस्टानं पाठवलेलं पत्र किंवा पार्सल लवकर पोहोचणार; पोस्ट ऑफिस नवीन सेवा सुरू करणार, अंमलजावणी कधी?
Post Office Fast Delivery Service: आता पोस्ट ऑफिस नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार आहे. याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी मोठी माहिती दिली आहे.
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलिकडेच एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय टपाल विभाग नवीन जलद वितरण सेवा सुरू करणार आहे. एकदा या सेवा लागू झाल्यानंतर, पोस्ट ऑफिस २४ तास आणि ४८ तासांच्या आत टपाल आणि पार्सल पोहोचवण्याची हमी देतील. याचा अर्थ असा की, एकदा ही सेवा सुरू झाली की, तुम्हाला तुमचे महत्त्वाचे कागदपत्रे किंवा पार्सल पोहोचवण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.

