

UP Shocker: Daily Wage Labourer Gets Rs 7 Crore Income Tax Notice
eSakal
Viral News UP : उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्यातील रुदामऊ गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जी कोणालाही आश्चर्यचकित करू शकते. येथे राहणाऱ्या एका रोजंदारीवर मजुरी करणाऱ्या गोविंद कुमार यांना आयकर विभागाकडून ७ कोटींहून जास्तीची कर नोटीस पाठवण्यात आली आहे. गोविंद कुमार रोज मजुरी करवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत करोडोंच्या कर नोटीसमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे.