

UPI Latest Updates New Payment Features Aim To Make Digital Transactions Faster Simpler And More Convenient
sakal
सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर-सीएफपी
डिजिटल पेमेंट आणखी सुलभ व सुरक्षित करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘यूपीआय टॅप अँड पे’ आणि ‘माय यूपीआय’ या दोन नव्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या हस्ते अलीकडेच मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टदरम्यान या सुविधा अधिकृतपणे दाखल करण्यात आल्या. लवकरच त्या सर्व प्रमुख यूपीआय ॲपवर (उदा. भीम, गुगल पे, फोनपे) उपलब्ध होणार आहेत.