
Central Government: दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रुपयांच्या यूपीआय व्यवहारांवर केंद्र सरकार कर लागू करणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात फिरत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. परंतु केंद्र सरकारने याबाबत खुलासा केला असून कुठल्याही प्रकारचा टॅक्स यूपीआय व्यवहारांवर लागणार नाही. उलट अशा व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.