

Digital spending or Dopamine Spending
Sakal
how UPI payments affect your brain: आपल्या आयुष्यात जेव्हापासून डिजिटल पेमेंट ची संकल्पना आलीये तेव्हापासून फिजिकल कॅश बाळगण्याची सवय गेलीये. UPIसारख्या डिजिटल पेमेंट पद्धतींनी ग्राहकांचा पैसे खर्च करण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे.
रोख रक्कम हातात न घेता खर्च करणं इतकं सोपं झालंय की आता पैसे देताना वेदना जाणवतच नाही. QR कोड स्कॅन करा, “Payment Successful” झाल्याचा हिरवा टिक पाहा आणि झालं! पण या सोपेपणामागे आपल्या मेंदूचं गणित पूर्णपणे बदलत चाललं आहे ही गोष्ट आपल्याला समजून येत नाहीये.