

UPI Records All-Time High Transactions in October
Sakal
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात खरेदीसाठी ‘यूपीआय’चा सर्वाधिक वापर झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये विक्रमी २७.२८ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार झाले. या कालावधीत एकूण २०.७ अब्ज व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात २३.४९ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार झाले होते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ही आकडेवारी जाहीर केली.