अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

Raghuram Rajan: अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी फेडरल रिझर्व्हने पाच विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या महत्त्वाच्या समित्यांमध्ये माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह भारतीय वंशाच्या तीन दिग्गज तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.
US Inflation Crisis Deepens! Raghuram Rajan Among 3 Indian-Origin Experts Chosen for Key Fed Task Force

US Inflation Crisis Deepens! Raghuram Rajan Among 3 Indian-Origin Experts Chosen for Key Fed Task Force

Updated on

US Fed News: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपल्या चलनविषयक धोरणांची आणि कार्यपद्धतीची व्यापक समीक्षा करण्यासाठी पाच विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. फेडचे नवे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या समित्यांमध्ये माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह भारतीय वंशाच्या तीन नामांकित तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. हे लोक अमेरिकेच्या महागाईवर नियंत्रणात आणण्यासाठी रीपोर्ट बनवणार आहे.

अमेरिकेत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या तज्ज्ञांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, महागाई नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आणि धोरणात्मक सूचना देण्याचे काम ते करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com