

US-Iran Conflict Sparks Fears – How It May Hit Gold, Stocks and Petrol Prices in India
eSakal
USA-Israel-Iran War Economic Impact: मागच्या काही दिवसांपासून तणावात असणारे अमेरिका-इस्रायल आणि ईराण संघर्षाने आज युद्धाचे रूप घेतले आहे. सकाळी इस्रायलने इराणवर हल्ला केला असून यानंतर इस्रायलने आपल्या देशात आणीबाणी जाहीर केली आहे. मध्य पूर्वेत असणाऱ्या या देशांतील संघर्षात अमेरिकेने पाठबळ दिल्यामुळे आता याचे परिणाम मोठ्या प्रमाणात जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. येत्या काळात जागतिक बाजारपेठांवर मोठ्या प्रमाणात दबाव येण्याची शक्यता असून कच्च्या तेलापासून ते सोनं-चांदी आणि रोजच्या वस्तू ते शेअर बाजार या सर्वांवर यांचे मोठे परिणाम पुढच्या काळात बघायला मिळतील.