
अमेरिकेनं बिटकॉइनचा खेळ सुरू केल्यानं जगात सोन्याचे दर कोसळण्याची शक्यता निर्माण झालीय. अमेरिकेनं सोन्याचे साठे विकून बिटकॉइन खरेदीचा प्लॅन आखला आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून तयारीही सुरू करण्यात आलीय. ट्रम्प प्रशासनाच्या या खेळीने सोन्याचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.