

Trump’s 25% Tariff Shock: How India-Iran Trade and Farmers Could Be Hit
eSakal
US Tariff Impact On India : अमेरिकेने पुन्हा एकदा टॅरिफचा वापर करत जागतिक व्यापारात खळबळ उडवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय तात्काळ लागू झाला असून तो अंतिम आणि निर्णायक असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे इराणसोबत आर्थिक संबंध असलेल्या देशांवर याचा परिणाम होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतदेखील त्यापैकीच एक देश आहे, कारण भारताचे इराणसोबत जुने व्यापारी संबंध राहिले आहेत.