
विशाखा बाग
gauribag7@gmail.com
मूल्याधिष्ठित गुंतवणूक म्हणजे काय, तर ज्या कंपनीमध्ये गुंतवणूकदार भांडवली गुंतवणूक करणार आहे, त्या कंपनीची सर्व निकषांवर आधारित माहिती घेऊन मगच त्यामध्ये गुंतवणूक करणे. थोडक्यात, त्या कंपनीचे बाजार मूल्य किती आहे?
कंपनीचे खेळते भांडवल किती आहे? कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे? म्हणजेच कंपनीकडे किती पैसा रोखीच्या स्वरूपात आहे, कंपनीवर किती कर्ज आहे, कंपनीची भविष्यातील वाटचाल कशी आहे?
पुढील काही वर्षांत कंपनीकडे व्यवसायाच्या किती संधी उपलब्ध आहेत? अशी सर्व माहिती मिळवून आणि त्यावर अभ्यास करून मगच केलेली गुंतवणूक ही भविष्यात अतिशय चांगला परतावा देऊ शकते.
एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ, गुंतवणूकदार असलेले बेंजामिन ग्रॅहम यांनी विसाव्या शतकामध्ये शेअर बाजारातील गुंतवणूक ही मूल्याधिष्ठित कशी असावी? मूल्याधिष्ठित गुंतवणुकीचे महत्त्व काय आहे, हे जगाला पटवून दिले होते. त्यामुळे ‘मूल्याधिष्ठित गुंतवणुकी’चा जनक अशी बेंजामिन ग्रॅहम यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या दृष्टिकोनातून ‘मूल्याधिष्ठित गुंतवणूक’ म्हणजे काय? हे जाणून घेऊ या...