

Understanding Value Investing in Small Cap Stocks
Sakal
भूषण ओक (शेअर बाजार विश्लेषक)
शेअर बाजार
धन की बात या पुरवणीत सुरू केलेल्या निवडक कंपन्यांच्या या विश्लेषणात्मक लेखमालिकेत आतापर्यंत २२ कंपन्यांचा आपण अभ्यास केला. मूल्याधिष्ठित गुंतवणुकीच्या तत्वांवर आधारित असलेल्या या कंपन्यांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे या सर्व कंपन्या स्मॉल कॅप क्षेत्रातील आहेत. प्रसिद्ध अमेरिकी गुंतवणूकदार पीटर लिंच हे स्मॉल कॅप कंपन्यांचे मोठे चाहते होते, कारण अशा कंपन्यांचे भाव काही वर्षांत दुप्पट, चौपट आणि वीसपट पण होऊ शकतात.