
High returns may look attractive, but consistent savings are the true engine of wealth creation. Learn why saving more and spending smartly can build a secure financial future.
अजित मेनन, (सीईओ, पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड)
प्रत्येक जण आपल्या गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळावा, आपली संपत्ती वाढावी, असे स्वप्न पाहात असतो. एका रात्रीत आपले पैसे दुप्पट करणे, शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी मोठा शेअर शोधणे किंवा क्रिप्टो करन्सीच्या लाटेवर स्वार होऊन अकल्पनीय संपत्ती मिळवणे, ही स्वप्ने पाहत असतो. परंतु, संपत्तीनिर्मितीचे खरे रहस्य उच्च परताव्याचा पाठलाग करण्यात नसून, आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टीत म्हणजेच अधिक बचत व गुंतवणूक करण्यात आहे.
हवाहवासा उच्च परतावा आणि त्यासाठी असलेले आकर्षण कोणीही नाकारू शकत नाही. परंतु, तुमच्या उत्पन्नाचा अधिकाधिक भाग सातत्याने बचत करणे, हे एक अधिक विश्वासार्ह आणि शक्तिशाली धोरण आहे.
परंतु, या दृष्टिकोनासाठी एक तडजोड करणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे भविष्यातील अधिक लाभासाठी आज खर्च कमी करणे किंवा त्याला कात्री लावणे ही होय. परंतु, यात संतुलन साधणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, स्मार्ट आर्थिक निर्णय घेण्याबद्दल संतुलित भूमिका तुम्हाला वर्तमानात आनंद देतात आणि त्याचबरोबर स्वतःला अधिकाधिक सुरक्षित भविष्यासाठी सज्ज करतात.