websol energy system
sakal
- भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
वेगाने वाढणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जेची मागणीही निरंतर वाढत आहे. सध्या विद्युत ऊर्जेच्या निर्माणक्षमतेत कोळसा आणि नैसर्गिक वायू यांचा वाटा ५२ टक्के, तर प्रत्यक्ष निर्मितीत तो ७३ टक्के आहे. सरकारने २०३० पर्यंत पर्यायी ऊर्जानिर्मितीची क्षमता सध्याच्या २२८ गिगावॉटवरून ५०० गिगावॉटवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि सौरऊर्जेचा यात सिंहाचा वाटा असेल.