

Beating Inflation: Smart Investment Strategies for Real Returns
E sakal
Inflation in India: Causes, Effects and Control Measures
सुनील टाकळकर, नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आणि आर्थिक विषयांचे अभ्यासक
takalkars49@gmail.com
क्रिकेट, शेअर बाजार हे विषय कमी म्हणून की काय, गप्पा मारण्यासाठी वा टीकाटिप्पणी करण्यासाठी सर्वसामान्यांचा सर्वांत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महागाई..! कारण त्यांचे दैनंदिन जीवन त्या महागाईशी जोडलेले असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला सर्वसामान्य माणूस महागाईचा राग तरी करतो, वा स्वस्ताईच्या सुरस कथा सांगण्यात रममाण होतो, हे लक्षात घेता अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून महागाई म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत, ती मोजतात कशी आणि मुख्य म्हणजे ती आपल्या गुंतवणुकीवर कसा परिणाम करते, हे जाणून घेऊ या.
महागाई कमी झाली असे म्हटले, की सर्वसामान्य लोकांना मोठा आनंद होतो. तेच महागाई वाढली, की त्यांना आवडत नाही. परंतु, ही महागाई म्हणजे नेमके काय? अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून, तिचे महत्त्व काय, हे फारसे कोणाला माहीत नसते. ते जाणून घेणे सर्वांसाठीच खरेतर महत्त्वाचे आहे.