
विवेक दप्तरदार - चार्टर्ड अकाउंटंट - सीए
‘शोले’ म्हटलं, की सर्वांच्या डोळ्यांसमोर उभी राहते, ती जय-वीरूची अतूट दोस्ती, गब्बरची दहशत, ठाकूरचा दूरदर्शीपणा, बसंतीचा टांगा... १९७५ मध्ये आलेल्या ‘शोले’ची लोकप्रियता आज ५० वर्षांनंतरही कायम आहे. आजही त्यातील संवाद लोकांना तोंडपाठ आहेत. हा केवळ एक चित्रपट नव्हता; तर तो एक जबरदस्त अनुभव होता! थोडं वेगळ्या नजरेने पाहिलं, तर लक्षात येईल, की ‘शोले’नं केवळ मनोरंजनच केलं नाही, तर जीवनाची आणि व्यवहाराची अनेक मूल्ये शिकवली. ‘शोले’च्या गाजलेल्या संवादांमधून काही भन्नाट आर्थिक धडेदेखील मिळतात, हे धडे तुम्हाला ‘गब्बर-प्रूफ’ बनवतील!