LIC मध्ये जमा केलेला तुमचा पैसा नेमका कुठे जातो? जाणून घ्या

money deposited in LIC: एलआयसीचे मार्केटमधील नाव मोठे आहे. गावापासून शहरापर्यंत लोकांना एलआयसी काय आहे याची माहिती आहे.
LIC
LIC

नवी दिल्ली- एलआयसीचे मार्केटमधील नाव मोठे आहे. गावापासून शहरापर्यंत लोकांना एलआयसी काय आहे याची माहिती आहे. अनेक लोकांनी या कंपनीचा विमा खरेदी केलेला आहे. अनेकांनी एलआयसी कंपनीमध्ये शेअरच्या माध्यमातून गुंतवणूक केली असून ते चांगला नफा कमावत आहेत. हजारोंच्या संख्येने लोक विमा खरेदी करतात. अशावेळी कंपनी लोकांकडून मिळालेला पैसे कुठे ठेवते असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

एलआयसीमध्ये विमा घेतलेल्या लोकांना मॅच्युरिटीनंतर मोठी रक्कम मिळते. कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात परतावा कसा देते असा प्रश्न पडू शकतो. आपण जितकी जास्त रक्कम जमा करतो तितकी जास्त रक्कम मॅच्युरिटीनंतर मिळण्याची शक्यता असते. लोकांकडून जमा झालेले पैसे एलआयसी कुठे ठेवते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. (Where exactly does your money deposited in LIC go find out )

LIC
Share Market Closing: शेअर बाजारात विक्री सुरुच; सेन्सेक्स 465 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स तेजीत?

एलआयसी आपला पैसे कुठे ठेवते?

मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार एलआयसी आपल्याकडील पैसा मोठ्या प्रमाणात बॉन्डमध्ये गुंतवून ठेवते. जवळपास ६७ टक्के पैसा हा बॉन्ड्सवर लावला जातो. जवळपास ४.७ लाख कोटी रुपयांची इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय विविध प्रॉपर्टीजमध्ये जवळपास १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

म्यु्च्यअल फंड, सब्सिडियरिज आणि इतर डेट सिक्योरिटीजमध्ये देखील एलआयसीकडून गुंतवणूक केली जाते. दुसऱ्या कंपनीची हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी देखील एलआयसीने आपला पैसा वापरला आहे. अशा विविध माध्यमांमधूनही एलआयसी पैसा कमावत असते. शिवाय एकाचवेळी सर्व ग्राहकांना पैसे परत करावे लागत नसल्याने कंपनी आवश्यकतेनुसार दुसऱ्या ठिकाणचा पैसे मॅच्युरिटी आल्यानंतर ग्राहकांना परत करत असते.

LIC
Remittances: परदेशी भारतीयांचा मायदेशी पैसे पाठवण्याचा नवा विक्रम, 'या' देशातून आला सर्वाधिक पैसा

एलआयसी एक मोठी कंपनी

एलआयसीचा फूलफॉर्म हा लाईफ इंशॉरन्स कॉर्पोरेशन असा आहे. ही एक अवाढव्य कंपनी आहे. कंपनीचा पसारा मोठा आहे. कंपनीत जवळपास १ लाख कर्मचारी काम करतात. शिवाय एजेंट्स म्हणून १३ लाख लोक कंपनीशी जोडले गेले आहेत. भारतातील सर्व विमा एजेंट्सपैकी एलआयसीकडे तब्बल ५५ टक्के एजेंट्स आहेत.

एन्डोसमेंट, टर्म इंश्योरेन्स, चिल्ड्रन, पेन्शन, मायक्रो इंश्योरेन्स अशा पॉलिसीज कंपनी पुरवत असते. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विमा क्षेत्रातील भारतीय जीवन विमा निगमची हिस्सेदारी ५८.९ टक्के होती. एक वर्षांपूर्वी ती ६५.४ टक्के होती. (Money News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com