
भूषण महाजन
kreatwealth@gmail.com
लग्नसराई सुरु झाली आणि शेअर बाजाराने सुटकेचा निश्वास टाकला. कारण लगीनसराई म्हणजे ‘बँड, बाजा, बारात’ आणि होऊ दे खर्च! उत्तरेकडे खिशात पैसे असो व नसो; लग्नात मोठा खर्च व बडेजाव करण्याची पद्धत आहे.
दक्षिणेतही तसेच. तेथे तर वधू नखशिखांत सोन्याने मढलेली नसेल, तर लग्नाला उभीच राहात नाही. मध्यमवर्गीय महाराष्ट्र थोडासा मागे होता, पण आता तेथेही सुबत्ता नांदू लागली आहे आणि खर्चाचे लोण येथेही देशभरासारखेच पसरले आहे.
अर्थात लग्नखर्च पद्धतीचा उहापोह करण्याचा या लेखाचा उद्देश नाही. त्या निमित्ताने (पैसे शिल्लक राहिल्यास) गुंतवणूक कुठे करावी, हे आपण बघणार आहोत.