
सिद्धार्थ खेमका
(मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. )
इराण-इस्त्राईलमध्ये सुरू झालेले युद्ध, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आयातशुल्कवाढीचे धोरण, जागतिक व्यापारावर होणारा परिणाम या सर्व घडामोडींमुळे जागतिक शेअर बाजार आणि देशांतर्गत शेअर बाजारातही सतत चढ-उतार होत आहेत. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था आव्हानात्मक स्थितीतही वाढीचा वेग टिकवून असल्याने शेअर बाजारातील घसरणीत गुंतवणूकदारांसाठी खरेदीची चांगली संधी आहे.