Premium|Options trading risk : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाई दिवाळखोरीकडे? अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली मोठी चिंता!

Is Futures and Options Trading Like Gambling : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाई ऑप्शन ट्रेडिंगच्या चक्रव्यूहात कशी अडकतेय? 'सेबी'चा ९० टक्के तोट्याचा धक्कादायक अहवाल आणि सर्वसामान्यांची कष्टाची कमाई जळण्यामागच्या कारणांचा केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या चिंतेसह विशेष धांडोळा.
Is Futures and Options Trading Like Gambling

Is Futures and Options Trading Like Gambling

esakal

Updated on

निरंजन दांडेकर - niranjandandekar2007@gmail.com

सध्या गुंतवणूकदारांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये ‘ऑप्शन ट्रेडिंग’ची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. परंतु, या ग्लॅमरच्या मागे दडलेले वास्तव काय आहे, या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे :

प्रश्न : वायदे बाजार (फ्युचर्स अँड ऑप्शन्स) म्हणजे नक्की काय आणि तो धोक्याचा का मानला जातो?

उत्तर : वायदे बाजार म्हणजे एका ठरावीक तारखेला आणि ठरावीक भावाला शेअर खरेदी किंवा विक्री करण्याचा करार. हा प्रकार मूलतः मोठ्या गुंतवणूकदारांनी आपली जोखीम कमी करण्यासाठी ‘हेजिंग’ म्हणून तयार केला होता; पण आज सर्वसामान्य नागरिक याचा वापर सट्टेबाजीसाठी करत आहेत. यात अल्प भांडवलात मोठी जोखीम घेता येते. त्यामुळे फायदा झाला तर मोठा होतो; पण तोटा झाला तर संपूर्ण भांडवल काही मिनिटांत शून्य होऊ शकते.

प्रश्न : ‘सेबी’च्या आकडेवारीनुसार ट्रेडिंगमध्ये कमावणाऱ्यांचे प्रमाण किती आहे?

उत्तर : ‘सेबी’चा अधिकृत अहवाल सांगतो, की वायदे बाजारात व्यवहार करणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक छोट्या गुंतवणूकदारांना तोटा होतो. धक्कादायक बाब म्हणजे, जे १० टक्के जण नफा कमावतात, त्यातील बहुतेकांना ‘निफ्टी’ निर्देशांकाने दिलेल्या परताव्यापेक्षाही कमी नफा मिळतो. म्हणजेच, प्रचंड जोखीम घेऊनही त्यांचा नफा हा साध्या गुंतवणुकीपेक्षा कमी असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com