

Credit Card Insurance Cover
ESakal
जर एखादा अपघात झाला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाले तर दुःखासोबत आणखी एक भीती असते, थकीत क्रेडिट कार्ड बिल... कुटुंबाला हे कर्ज फेडावे लागेल का? बँक वसुलीसाठी आवाहन करेल का? की या कठीण काळात कुटुंबाला आर्थिक धक्क्यापासून वाचवणारे दुसरे काही कवच आहे का? फार कमी लोकांना माहिती आहे की क्रेडिट कार्डसोबत येणारे विशेष विमा कवच मृत्यू किंवा अपघात झाल्यास हे कर्ज फेडू शकते.