
Income Tax Filing: Avoid Penalties, Secure Your Financial Future
डॉ. दिलीप सातभाई
dvsatbhaiandco@gmail.com
प्राप्तिकर विवरणपत्र भरणे हे प्रत्येक करदात्याचे कर्तव्य आहे. अनेकदा करदात्यांचा असा गैरसमज असतो, की आपले उत्पन्न करपात्र नाही, तर आपल्याला करविवरणपत्र भरण्याची गरज नाही. मात्र, अशा करदात्यांनादेखील करविवरणपत्र भरणे आवश्यक असते. करविवरणपत्र वेळेत भरणेदेखील महत्त्वाचे असते. वेळेत भरल्यामुळे विलंब शुल्क, दंड यापासून सुटका होते.
प्रत्येक करदात्याने त्याचे प्राप्तिकर विवरणपत्र देय तारखेनंतर म्हणजे करनिर्धारण वर्षाच्या ३१ जुलैपर्यंत दाखल करणे आवश्यक असते. यंदा ही मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना करविवरणपत्र भरण्यासाठी अधिक मुदत मिळाली आहे. त्यामुळे विलंबशुल्क टाळणे शक्य होणार आहे.