
राजेंद्र केळकर - संचालक, केळकर इन्व्हेस्टमेंट्स
आपण टीव्ही किंवा टाय खरेदी करत असलो, तरी स्वाभाविकपणे गुणवत्ता आणि किंमत यावर आपला खरेदीचा निर्णय केंद्रित असतो. मग आपण आपल्या गुंतवणुकीबाबतही त्याच गुणवत्तेवर का लक्ष केंद्रित करत नाही? आकडेवारी सांगते, की शेअर बाजारात उच्च गुणवत्तेच्या व्यवसायांमधील गुंतवणूक दीर्घकाळासाठी उत्तम परिणाम देऊ शकते. एप्रिल २००५ ते मार्च २०२५ दरम्यान ‘निफ्टी २०० क्वालिटी ३० टोटल रिटर्न इंडेक्स’ने ‘निफ्टी २०० टोटल रिटर्न इंडेक्स’पेक्षा वार्षिक आधारावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.