
किरांग गांधी - अनुभवी आर्थिक मेंटॉर
प्रत्येक बाजारचक्रात एक गोष्ट सातत्याने घडते, ती म्हणजे छोटे (रिटेल) गुंतवणूकदार बाजार शिखराच्या जवळ असतो, तेव्हा मोठ्या उत्साहात गुंतवणूक करतात आणि त्यानंतर, बाजारात घसरण होते, तेव्हा घाबरून नुकसान पत्करून गुंतवणूक काढून घेतात. ही गोष्ट पुन्हा पुन्हा घडत असल्याचे दिसून येते. अशी चुकीच्या वेळी गुंतवणूक काढून का घेतली जाते किंवा केली जाते, याची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.