
प्रसाद संगम - संचालक, एकोर्निया इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस
आर्थिक गुंतवणूक म्हणजे एक नियोजित बाग सांभाळण्यासारखे आहे, जिथे विविध हंगामांत विविध झाडे चांगल्या प्रकारे वाढवली जातात. त्याचप्रमाणे बाजाराच्या बदलत्या परिस्थितीत इक्विटी, कर्ज आणि सोने हे वेगवेगळे मालमत्ता वर्ग वेगवेगळ्या वेळी चांगले प्रदर्शन करतात. याचाच आधार घेऊन म्युच्युअल फंडांमध्ये धोरणात्मक मालमत्ता वाटपाद्वारे चांगला परतावा मिळवला जातो. त्यामुळे गुंतवणूकदारांना बाजाराच्या चक्रांशी जुळवून घेणारे पोर्टफोलिओ तयार करणे शक्य होते आणि दीर्घकालीन उत्तम परतावा प्राप्त करता येतो.