
आपल्या गुंतवणुकीचा वर्षातून एकदा आढावा घ्यायला हवा.
जेणेकरून आपली गुंतवणूक अधिक सुटसुटीत राहील. शेअर्स, म्युच्युअल फंड, मुदत संपलेल्या ठेवी, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक, पीपीएफ खाते, परतफेड झालेल्या बँक कर्जाची अनावश्यक कागदपत्रे अशा अनेक गोष्टींचा आढावा वेळोवेळी घेणं आवश्यक आहे.
अशा वेळोवेळीच्या झाडाझडतीतून कागदपत्रांचा कचरा बाजूला करून नेमकी महत्त्वाची कागदपत्रं पटकन मिळतील, अशी ठेवणं सहज शक्य होतं.
अनिकेत: येऊ का सर?
शिक्षक: ये अनिकेत! बस... बस... आज काय विशेष? आणि कशी झाली दिवाळीची सुट्टी?
अनिकेत: सर, एकदम मस्त! आठ दिवस सुट्टी होती ऑफिसला. सुट्टीत शेवटी दोन दिवस बाहेरगावी फिरायला गेलो होतो.
शिक्षक: अरे वा! मग आता ऑफिस सुरू झाल्यावर कसं वाटतंय?
अनिकेत: छान वाटतंय सर! आम्ही आमच्या ऑफिसमध्ये एक नवा उपक्रम सुरू केला आहे, तेच सांगायला आलोय.
शिक्षक: अरे वा! काय आहे ती नवी गोष्ट?
अनिकेत: सर, आम्ही ऑफिसात ‘दिवाळीनंतरची स्वच्छता’ असा उपक्रम सुरू केला आहे. शिक्षक: उपक्रमाचे नाव मस्तच आहे. काय करणार आहेत तुम्ही त्यात?