

mportance Of Writing A Will A Thoughtful Way To Protect Family Interests Property Rights And Personal Wishes
sakal
अर्थबोध, गौरी रास्ते इच्छापत्र सल्लागार
आयुष्यभर कष्ट करून उभी केलेली संपत्ती, घर, दागिने, बचत आणि गुंतवणूक यांचे भवितव्य काय असावे? कोणता मार्ग निवडून आपली संपत्ती आपल्या निधनानंतर योग्य वारसांच्या हाती सुखरूपतेने मिळेल? यावर नोंदणीकृत इच्छापत्र करणे हा सोपा मार्ग समोर असूनही, अनेक कारणे देत हा महत्वाचा विषय पुढे ढकलला जातो. इच्छापत्र न करण्यामागे अनेक कारणे, सबबी, पोकळ शंका असतात.