

December 31 Deadline: Essential Tax Actions for Taxpayers
Sakal
ॲड. सुकृत देव, करसल्लागार
प्राप्तिकर आणि वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभाग आता अधिक आधुनिक झाले असून, जास्तीत-जास्त डेटा लिंक करण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थ मंत्रालय करत आहे. करप्रणाली पारदर्शक झाली आहे, यामुळे करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र किंवा वस्तू व सेवाकर विवरणपत्र, वेळेत दाखल करणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.