Premium|Swiss Investment Philosophy : स्विस गुंतवणूक तत्त्वांचा मंत्र; श्रीमंतीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन

Zurich Axioms Investment Rules : स्विस बँकिंगच्या अनुभवातून गुंतवणुकीतील धोका, तोटा, मानसिकता आणि शिस्त यांचा वेध घेणारा संवादरूप लेख पारंपरिक आर्थिक समजुतींना आव्हान देत ‘झुरिच अॅक्सिओम्स’ची वेगळी गुंतवणूक तत्त्वे उलगडतो.
Swiss Investment Philosophy

Swiss Investment Philosophy

esakal

Updated on

विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.com

अमेरिकेतील आर्थिक पत्रकार मॅक्स गुंथर यांनी लिहिलेल्या ‘झुरिच अॅक्सिओम्स’ (The Zurich Axioms) या पुस्तकावर आधारित हा लेख गुंतवणुकीतील पारंपरिक समजुतींना छेद देणारा ‘स्विस पॅटर्न’ संवादरूपात उलगडतो. धोका, संधी, तोटा, मानसिक भ्रम आणि गुंतवणुकीतील शिस्त यांचा वेध घेत धनंजयराव आणि छोटू यांच्या गप्पांतून हा विषय अतिशय रंजकपणे उलगडत जातो.

धनंजयराव नेटफ्लिक्सवर सिनेमा बघत होते. आज ते एकटेच घरी होते. हातात मस्तपैकी आंबेमोहारापासून बनवलेली थंडगार बिअर होती आणि मधेमधे करायला छोटू नसल्याने ते खुशीत होते. ‘द बिग शॉर्ट’ (The Big Short) नावाचा सिनेमा बघता बघता ते गुंगून गेले होते. तितक्यात दाराची घंटा वाजली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com