hous of bamboo
sakal
नअस्कार! हृदयाची धडधड वाढली आहे. उत्कंठा ताणली गेली आहे. ‘तो’ क्षण नजीक आला आहे. कसला काय विचारता? सातारच्या साहित्यगादीवर कोण बसणार, याचा निकाल लागण्याची वेळ आली आहे. ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची गडबड एव्हाना सुरु झाली असून परवाच ख्यातकीर्त व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय फडणीस यांनी स्वत:च संमेलनाचं बोधचिन्ह चित्रित करुन स्वत:च त्याचं अनावरण केलं.