
शेखर गुप्ता
जोहरान मामदानी हे नाव सध्या अमेरिकेतील राजकीय वर्तुळात किंवा न्यूयॉर्क शहरातच नव्हे तर भारतातही चर्चेत आहे. किंवा आजच्या डिजिटल युगाच्या भाषेत बोलायचे झाल्यास, अलीकडील काळात इंटरनेटवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या नावांत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे.