

The Art of Explanation: Understanding Drishtanta (Examples) in Communication
Sakal
हल्ली कोणताही शोधनिबंध अथवा प्रबंध लिहिताना त्या विषयाची परिभाषा बनविण्याची पद्धती विकसित झाली आहे. आयुर्वेदाचार्य चरकांनी अशी ‘परिभाषा’ संकल्पना (वादपरिभाषा किंवा वादमार्ग) मांडली. विषय ‘परिभाषे’ची संकल्पना मांडणे, हा चरकाचार्यांच्या वैज्ञानिक दूरदृष्टीचा भक्कम पुरावा मानता येतो. ही परिभाषा चव्वेचाळीस संकल्पनांनी बनलेली आहे. त्यातील दृष्टान्त, सिद्धान्त आणि शब्द, वाक्यदोष, वाक्यप्रशंसा, च्छल, निग्रहस्थान, या निवडक सात संकल्पनांचा परिचय आजही आवश्यक आहे. प्रस्तुतच्या या पूर्वार्ध लेखात दृष्टान्त, सिद्धान्त आणि शब्द या तीन संकल्पनांचे आणि नंतरच्या उत्तरार्ध लेखात इतर चार संकल्पनांचे स्वरूप पाहू :