
Anesthesia Safety
sakal
डॉ नंदिनी लोंढे
‘‘मॅडम एक पेशंट पाठवतो तुमच्याकडे. त्याला खूप शंका आहेत.. जरा बोलून घ्याल?" फोनवरच होकार देऊन येणाऱ्या पेशंटची वाट पाहात बसले. उंचापुरा, गोरटेला, धिप्पाड शरीरयष्टी असणारा ‘देखणा’ या प्रकारात मोडणारा युवक पुढच्या पंधरा मिनिटात समोरच्या खुर्चीत स्थानापन्न झाला. सतत हातांची हालचाल, पाठीला लावलेल्या बॅगशी चाळा आणि बावरलेले, काळजीने भरलेले डोळे यांवरून मन अस्वस्थ आहे ह्याची खात्री पटत होती.