बदलाची सुरुवात स्वतःपासून!

बदलाची सुरुवात स्वतःपासून!

दोघं मित्र समुद्रावरच्या वाळूत बसलेले आहेत समोरासमोर. एक जण वाळूत हास्यरेषा काढतो आणि ‘किती छान आहे’ असं म्हणतो. ती हास्यरेषा दुसऱ्याला त्याच्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’नं रडवी रेषा दिसते म्हणून तो ती पुसतो आणि स्वतःच्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’नं हास्यरेषा  काढतो. पहिल्याला ती रडवी वाटते. यातून मग मतभेद वाढत जातात. म्हणता म्हणता दोघे मित्र हमरीतुमरीवर येतात. कौटुंबिक स्तरापासून व्यावसायिक क्षेत्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत होणारे कलह दृष्टिकोन वेगळा असल्याने होताना दिसतात. मन मोठं करणं म्हणजे दुसऱ्याला माफ करणंच नाही फक्त, तर दुसऱ्याच्या मनात शिरून घटनेकडं बघणं आणि स्वतःची ठाम समजूत बदलून दुसऱ्याला समजून घेणं. पांढऱ्या कागदावर, ‘काळा’ असा शब्द लिहिला आणि विचारलं,‘ हे काय आहे ?’  तर कोणी म्हणेल, ‘काळा’ आणि कोणी म्हणेल ‘पांढरा’. दोन्ही उत्तरं एकाच वेळी बरोबर असतील किंवा चुकीची ठरतील. निर्णय देणारा कसा विचार करतो याच्यावर ते अवलंबून असेल. जगात पांढरं आणि काळं असं काही नसतंच, असतं ते करडं. हे एकदा समजलं, की आयुष्य रंगीत झालंच म्हणून समजा. नुकत्याच पाहिलेल्या `ग्रे’ या शॉर्टफिल्ममधून मिळणारा हा संदेश महत्त्वाचा वाटला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्याच्या काळात ही समजूत वाढीला लागण्याची गरज आहे, असे मला वाटतं. त्यासाठी नववर्ष हे उत्तम निमित्त. ‘नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा’ हे शब्द किती छान आहेत ना... त्यातला एकेक शब्द मला प्रचंड ऊर्जा देऊन जातो. बघा ना, ‘नवीन’ हा शब्द, आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू शकतो, याचा विश्वास मनात जन्माला घालतो. सुरुवात कशाची? आजवरच्या अपयशाला यशात बदलवण्याची, व्यसनांना सोडण्याची, आयुष्याला रुळावर आणण्याची, बिघडलेले सबंबंध सुधारण्याची, नवीन शिकण्याची, राहून गेलेल्या गोष्टी करण्याची... खरंतर वर्ष बदलतं म्हणजे होतं काय ? सूर्य तर नेहमीसारखाच उगवतो. तो ठरलेल्या वेळी उगवतो आणि मग अर्थातच पक्षी, प्राणी, झाडं, कीटक, मागील पानावरून पुढं असंच जगतात. पण काळ मोजणं ही माणसाची गरज आहे. एक वर्ष संपतं आणि दुसरं सुरू होतं ते त्याच्यासाठी. पण मग हा बदल, काही बदलण्यासाठी वापरणं गरजेचं आहे, नाही का?  कॅलेंडर बदलणं एवढाच अभिप्रेत नाही अर्थ, वर्ष बदलण्याचा. आपण किती बदललो याचाही विचार व्हायला हवा. हे वयानं मोठं होणं, मनानं मोठं होण्यातही परिवर्तीत होतं ना, हे तपासण्यासाठी, बघण्यासाठी असतात या ‘नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा’!

 मन मोठं करायचं म्हणजे छोट्या गोष्टींकडे आपोआपच दुर्लक्ष होतं. ‘तो मला असं का बोलला ? आता मीही त्याला सुनावणार’ या विचारांमध्ये किंवा शब्द, प्रतिशब्द, वाद, प्रतिवाद या दुष्टचक्रामध्ये अडकून पडलं, की ते चक्र आपल्याला गोल गोल फिरवत राहतं. पावलं पुढे टाकण्यासाठी असतात, हेच विसरायला लावतं. कोणी वाईट वागत असेल आपल्या दृष्टीनं, तर त्याला उत्तरं देत, प्रतिहल्ला करत राहणं, म्हणजे आपल्या आयुष्यात त्याला प्रचंड मोठं स्थान देणं. मोठ्या मनाची माणसं धडा शिकवत बसत नाहीत. ती धडाडी ते उंच भरारी घेण्यासाठी वापरतात आणि त्यासाठी ते आपलं वर्तुळ बदलतात, ज्यात या त्रास देणाऱ्या माणसांना त्यांनी प्रवेश बंद केलेला असतो.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com