सेरो सर्व्हे आणि समूह प्रतिकारशक्ती 

अभिषेक ढवाण 
Monday, 28 September 2020

"कोविड'चा संसर्ग वाढत असताना काही नव्या संज्ञा आपल्या दृष्टीस पडत आहेत. त्यातील सरो सर्व्हे म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपल्याला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील, त्या म्हणजे अँटीजेन आणि अँटीबॉडी. 

"सेरो सर्व्हे' किंवा सेरोसर्व्हिलेन्स हा शब्द किंवा याबद्दलच्या काही बातम्या हल्ली आपण बऱ्याच माध्यमांतून ऐकतो आहोत. "कोविड-19'च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच विविध सर्वेक्षणेही वाढत आहेत. सेरो सर्व्हे कसा करतात, त्याचा अर्थ नेमका काय व तोच अर्थ नेमका कसा काढला जातो, हे आपण या लेखातून जाणून घेऊ या. 

"कोविड'चा संसर्ग वाढत असताना काही नव्या संज्ञा आपल्या दृष्टीस पडत आहेत. त्यातील सरो सर्व्हे म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपल्याला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील, त्या म्हणजे अँटीजेन आणि अँटीबॉडी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अँटीजेन आणि अँटीबॉडी 
अँटीजेन हा एखाद्या जिवाणू किंवा विषाणूवरचा एक रेणू आहे, जो शरीरामध्ये संबंधित विषाणू गेल्यावर प्रतिकार प्रतिक्रिया (इम्युन रिस्पॉन्स) उत्तेजित करण्यास सक्षम असतो. प्रत्येक अँटीजेनची विशिष्ट वैशिष्ट्ये असतात, जी प्रतिरक्षा प्रणालीद्वारे ओळखली जातात. अँटीबॉडी हे Y-आकाराचे प्रथिने आहेत. जे संक्रमणानंतर तयार होते आणि प्रत्येक अँटीजेनसाठी विशिष्ट अँटीबॉडी शरीर तयार करते. ज्यावेळी आपल्याला एखाद्या विषाणू किंवा जिवाणूचे संक्रमण पहिल्यांदाच होते, तेव्हा ठरावीक वेळेनंतर या अँटीबॉडी तयार होऊन त्या अँटीजेनला विशिष्ट प्रकारे बांधल्या जातात आणि ही प्रक्रिया शरीरामध्ये अँटीजेन काढून टाकण्यास मदत करते. यामुळे संक्रमण व त्याचा त्रास कमी होतो. 

सेरो सर्व्हे म्हणजे काय? 
सेरोसर्व्हिलेन्स संसर्गजन्य रोगांविरुद्ध लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीच्या पातळीचे अनुमान प्रदान करते. मागील किंवा होऊन गेलेले संक्रमण किंवा लशीकरणामुळे किती लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली हे मोजण्यासाठी हा जागतिक स्तरावर वापरला जाणारा आणि विश्वासार्ह मानक आहे. कालांतराने केलेल्या सेरो सर्वेक्षणांद्वारे आपल्याला आजारासंबंधी सांख्यिकी आकडेवारीबद्दल माहिती मिळू शकते. संसर्गाचा वाढत असलेला प्रसार, उपचाराची किंवा लशीची उपयुक्तता, तयार होत असलेली हर्ड इम्युनिटी (समूह प्रतिकारशक्ती) अशी बरीच माहिती मिळू शकेल 

सेरो सर्व्हेच्या अनुमानानुसार बऱ्याच लोकांना संसर्ग होऊन गेला आहे व ते झालेल्या लोकांनाही माहीत नाही, असे शक्‍य आहे का? 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही शक्‍यता नाकारता येणार नाही. शरीर रोगाला अनेक प्रकारे प्रतिकार करते. शरीरात एखादा विषाणू आल्यावर पहिल्यांदा 'इनेट इम्युनिटी' काम करते, म्हणजे तो आपल्या प्रतिकारशक्तीचा प्रथम प्रतिसाद असतो. संक्रमण कमी झाले नाही, तर "अडॅप्टिव्ह इम्युनिटी' काम करते. म्हणजे तो आपल्या प्रतिकारशक्तीचा दुय्यम प्रतिसाद असतो. एखाद्याला इतर काही आजार नसतील, शारीरिक प्रकृती उत्तम असेल आणि 'इनेट इम्युनिटी' बळकट असेल किंवा व्हायरल लोड कमी असेल, तर तो इसम "असिम्प्टोमॅटिक' होऊ शकतो. म्हणजेच, लक्षणे नसतानाही त्यांना संसर्ग झालेला असतो आणि ते कदाचित नकळत बरेही होऊ शकतात. तुम्ही बरे झाल्यानंतर "सेरो सर्व्हे'मध्ये तुमच्या शरीरात अँटीबॉडी सापडतात, पण त्यावेळी तुम्हाला संसर्ग वा लक्षणे नसतात आणि म्हणूनच असे अनुमान काढले जाते की, तुम्हाला संसर्ग होऊन गेला आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संक्रमण आणि प्रतिकारशक्ती 
हर्ड इम्युनिटी हा संसर्गजन्य रोगापासून अप्रत्यक्ष संरक्षणाचा एक प्रकार आहे. लोकसंख्येची पुरेशी टक्केवारी लशीकरण किंवा मागील संक्रमणाद्वारे संक्रमणास प्रतिरक्षित बनते, तेव्हा ज्यांना रोग प्रतिकारशक्ती नसते अशा लोकांच्या संसर्गाची शक्‍यता कमी होते. उदाहरणार्थ, समजा, लोकसंख्येच्या 80टक्के लोक प्रतिरक्षित बनतात, म्हणजेच पाचपैकी चारजणांना संक्रमण होऊन गेल्यावर त्या लोकांना परत संक्रमित होण्याचा धोका फार कमी होतो. त्यामुळेच हे लोक इतरांनाही संक्रमण करीत नाहीत. अशा प्रकारे कमी प्रतिकारशक्ती असलेले लोकही संक्रमणापासून वाचतात. सेरो सर्वेक्षणावरून एखाद्या भागात हर्ड इम्युनिटी मिळवण्याच्या आपण किती जवळ आहोत, हे अंदाजे कळू शकते. हर्ड इम्युनिटीसाठी किती टक्के लोक प्रतिरक्षित हवे आहेत, हे सांगणे कठीण आहे व त्यासाठी अनेक निकष आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Coronavirus disease Sero survey and group immunity

Tags
टॉपिकस
Topic Tags: