इस्लामी राष्ट्रांतील गृहकलह

शेखर गुप्ता
Sunday, 1 November 2020

जगातील कोट्यवधी मुस्लिमांमध्ये ते इस्लामद्वेषाचे बळी ठरत असल्याची भावना आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी चाकू हल्ल्यानंतर इस्लाम खरंच संकटात असल्याचा थेट आरोप केला. त्यानंतर तुर्कीचे अध्यक्ष रिसेप एर्दोगन यांनी मॅक्रॉन यांना त्यांचे डोके तपासण्याचा सल्ला दिला, तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मुस्लिम राष्ट्रांना दोन पानी पत्र पाठवले; मात्र मलेशियाच्या ९५ वर्षाच्या महातीर मोहंमद यांना आपली जीभ आवरता आली नाही.

जगभरातील १० कोटी मुस्लिम धर्मीयांना ते सामूहिक इस्लामाद्वेषाचे बळी ठरत असल्याचे वाटते. याचा अर्थ संकटाची भावना आहे; मात्र या सत्यालाही अनेक पैलू आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगातील कोट्यवधी मुस्लिमांमध्ये ते इस्लामद्वेषाचे बळी ठरत असल्याची भावना आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी चाकू हल्ल्यानंतर इस्लाम खरंच संकटात असल्याचा थेट आरोप केला. त्यानंतर तुर्कीचे अध्यक्ष रिसेप एर्दोगन यांनी मॅक्रॉन यांना त्यांचे डोके तपासण्याचा सल्ला दिला, तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मुस्लिम राष्ट्रांना दोन पानी पत्र पाठवले; मात्र मलेशियाच्या ९५ वर्षाच्या महातीर मोहंमद यांना आपली जीभ आवरता आली नाही. इस्लामची निंदा केल्यामुळे फ्रेंच नागरिकांच्या हत्येचे त्यांनी थेट समर्थन केले. शक्तिशाली मुस्लिम देश आणि बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातील प्रमुख नेत्यांची प्रतिक्रिया बघता इस्लाम संकटात असल्याचे लक्षात येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगातील सर्व धर्म राजकीय आहेत. त्यात इस्लाम जास्त राजकीय धर्म ठरला आहे. तुम्ही अनेक वर्षे लढलेल्या ख्रिस्ती धर्मयुद्धाबद्दल बोलू शकता. अल कायदा, इसिससारख्या दहशतवादी संघटनांचे नेते या धर्मयुद्धाचा वापर करताना दिसतात. काही इस्लामिक राष्ट्रही याचा उल्लेख करतात. ख्रिस्ती धर्मियांच्या खालोखाल इस्लाम हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा धर्म आहे. जगभरात इस्लाम धर्मीयांची संख्या २०० कोटींच्या घरात आहे. मात्र लोकशाहीच्या बाबतीत मुस्लिम राष्ट्रात ख्रिस्ती राष्ट्रांच्या तुलनेत उलट चित्र आहे. बहुसंख्याक मुस्लिम राष्ट्रांमध्ये लोकशाही व्यवस्था नाही. जगातील ६० टक्के मुस्लिम आशिया खंडात राहतात.

भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि पाकिस्तान या चार देशांमध्ये मुस्लिमधर्मीयांची संख्या जास्त आहे; मात्र या चारही देशात वेगवेगळ्या पद्धतीची लोकशाही व्यवस्था आहे. ज्या देशामध्ये बहुसंख्य मुस्लिम धर्मीय लोकसंख्या आहे, तिथे धर्मनिरपेक्षता हा वाईट शब्द मानला जातो; मात्र ज्या लोकशाही देशांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, तिथे धर्मनिरपेक्षता अत्यंत महत्त्वाची असून, ती सारखी सिद्ध करावी लागते. फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, बेल्जियम, जर्मनी अशी या देशांची उदाहरणे आहेत. यामध्ये भारताचा समावेश केला नाही, कारण पाश्‍चिमात्य देशांच्या निर्मितीनंतर मुस्लिमधर्मीय तिथे स्थलांतरित झाले होते आणि भारतात प्रजासत्ताक निर्मितीत मुस्लिम हे समान वाटेकरी होते. 

मुस्लिम लोकसंख्या आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये अद्यापही राष्ट्रवाद आणि जागतिक राष्ट्रीयत्व (पॅन नॅशनॅलिझम) या संकल्पनामध्ये वाद आहे. ‘उम्माह'' या संकल्पनेतून निर्माण झालेला हा वाद अद्यापही कायम आहे. जगातील सर्व मुस्लिम राष्ट्र एकच आहेत. इम्रान खान  यांनी त्यांच्या मुस्लिम राष्ट्रांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात याचा उल्लेख आहे. अतातुर्क केमाल पाशा यांनी ओट्टोमन साम्राज्य संपवून, तुर्कीश प्रजासत्ताकाची निर्मिती केली. त्यांच्या या कृतीविरुद्ध १९१९-२४ मध्ये खिलाफत चळवळ आकाराला आली. त्यानंतर सलमान रश्‍दी ते पॅलेस्टाईनच्या समर्थनाला लागलेली उतरती कळा आणि आता फ्रान्समधील घटना अशी अनेक उदाहरणे आहेत. पॅन इस्लामची संकल्पना असताना दुसरीकडे मुस्लिम राष्ट्रच मुस्लिम राष्ट्राविरोधात युद्ध लढताहेत. इराण-इराक युद्ध हे सर्वाधिक काळ चर्चेत होते.

अफगाण-पाकिस्तान भागात मुस्लिमच मुस्लिमांची हत्या करताहेत. अगदी शुक्रवारीही शिया मशिदीत बॉम्बस्फोट घडवले जाताहेत. मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येत लढण्याचे शेवटचे उदाहरण १९६७ च्या इस्राईल युद्धाचे होते. १९७३ मध्येही योम कीपूर युद्धातही ही इस्लामी राष्ट्रांची युती दिसली होती; मात्र त्यावेळी इजिप्त-जॉर्डनने शांततेसाठी करार केला होता. आता इस्राईल विरुद्ध लढण्यासाठी इराण एकटा देश उरला आहे, तर सिरीया गृहयुद्धाने उद्धवस्त झाला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध लढलेल्या युद्धात एकाही इस्लामिक देश पाकच्या मदतीला आला नाही. 

‘उम्माह''ची संकल्पना आता केवळ दहशतवादी संघटनांसाठी उपयोगाची आहे. अल कायदा, इसिस या खऱ्या अर्थाने जागतिक इस्लामिक (पॅन इस्लामिक) संघटना आहेत; मात्र त्यांच्या बहुतांश कारवाया इस्लामिक देशातच चालतात. इसिसच्या मते, सर्वच मुस्लिम राष्ट्रे ‘उम्माहा''चे भाग आहेत. त्या राष्ट्रांनी खिलाफतमध्ये सहभागी व्हावे आणि एकिकृत शरीयत व्यवस्था लागू करावी. अफगाणिस्तान, इराक, सीरिया, लीबिया अशी अनेक उदाहरण आहेत. या मुस्लिम राष्ट्रांना स्वतःचा राष्ट्रध्वज आहे, समर्थन करायला क्रिकेटचा संघ आहे. प्रेम करायला किंवा द्वेष करायला नेते आहेत. जर त्यांना नेत्यांचा राग आला, तर सत्तेतून हाकलवण्यासाठी मतदान करतात. मग या राष्ट्रांना काल्पनिक खिलाफत व्यवस्थेची आवश्‍यकता का आहे? 
 
चौथी बाब म्हणजे या राष्ट्रांमध्ये असलेला कमालीचा विरोधाभास. लोकसंख्या आणि श्रीमंती या दोन गोष्टी मुस्लिम जगताला विभाजित करतात. जागतिक इस्लामच्या संकल्पनेनुसार, संपत्तीचे न्याय वाटपास या श्रीमंत राष्ट्राची तयारी नाही. या देशांना पाश्‍चिमात्य देशासोबत आणि भारत आणि इस्त्राईलसोबत काम करायची तयारी आहे. कारण या राष्ट्रातील प्रत्येक गोष्ट, त्यांची राजकीय शक्ती, राजकीय विशेषाधिकार हे त्यांच्या जागतिक स्थानावर अवलंबून असते. 

आणि शेवटचे, या देशात लोकशाहीची कमी, बहुतांश इस्लामिक राष्ट्रांमध्ये तुम्ही तुमच्या सरकारविरोधात आंदोलन करू शकत नाही. तुमचा राजा अमेरिकेला विकला गेला, याबद्दल तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. फलक झळकावू शकत नाही किंवा संपादकाला पत्र लिहिणे किंवा साधे ट्विट करण्याची मुभा नसते. तसे केल्यास तुम्हाला थेट तुरुंगात जावे लागू शकते. २००३ मध्ये या संदर्भात मी लिहिले होते. त्या देशात तुम्ही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही; मात्र युरोप, अमेरिकेत जाऊन मात्र तुम्हाला हे करता येणे शक्‍य आहे. कडवट आणि नियंत्रित इस्लामिक देशात तुम्ही संतापाचा एक शब्द काढू शकत नाही. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या राष्ट्रात जातात. तिथे तुम्ही स्वच्छंद राहू शकतात.

वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन हीच विमाने तुम्ही ट्विन टॉवरवर धडकावू शकता. खालिद शेख मोहंमदसारख्या कडव्या दहशतवाद्यांना अमेरिकेत कायदेशीर न्यायालयीन लढाईचे हक्क आहे. म्हणजे तुम्ही स्वत:च्या सत्ताधीशांविरोधात लढू शकत नाही, त्यामुळे या सत्ताधिशांच्या पाठीराख्यांना का दंडीत करताहेत. याला जागतिक प्रतिशोध म्हणतात. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shekhar gupta on Islamic nations issue