Narendra-and-Amit
Narendra-and-Amit

मोदी - शहांचा अश्‍वमेध यज्ञ

लालकृष्ण अडवानी यांनी राजकारणात नवे मित्र जोडले. त्या बळावर मोदी-शहा हे सत्तेचा अश्‍वमेध यज्ञ करत आहेत. तुम्हाला हे आवडले तर छानच; मात्र आवडत नसल्यास त्यास आव्हान देण्यासाठी तुम्हाला व्हायरल टि्‌वटपेक्षा अधिक ट्‌विट्‌सची गरज भासेल.

लालकृष्ण अडवानी यांनी १९९८ मध्ये मित्रपक्षांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) स्थापना केली आणि देशाच्या राजकारणात आघाडी सरकारच्या युगाचा प्रारंभ झाला. कोणत्याही पक्षाला बहुमत नसणाऱ्या तीन आघाड्यांनी सरकार स्थापन करून संपूर्ण कार्यकाल पूर्ण केला. २०२० मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपने एनडीए संपवून राष्ट्रीय राजकारणात नवे नियम व समीकरणे लिहिली. अडवानी यांची ‘एनडीए' वापरून फेकून देण्यात आली आहे. थोडक्‍यात, एनडीए अस्तंगत झाली आहे.

यासाठी प्राचीन परंपरेतील एक उदाहरण चपखल लागू होते. सार्वभौम राज्य स्थापन करण्यासाठी अश्‍वमेध यज्ञ करण्यासाठी अश्‍व सोडावयाचा आणि स्वामित्व मिळवायचे. त्याचप्रमाणे नव्या भाजपसाठी एनडीए हा त्यागाचा अश्‍वच होता. आता त्या अश्‍वाचा उपयोग संपलेला आहे. असे असले तरी केंद्रात राज्य करणाऱ्या सरकारला अद्यापही एनडीएचे सरकार म्हटले जाते; मात्र सध्याच्या ५३ सदस्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात युतीचा अवघा एकच भागीदार पक्ष आहे आणि तो म्हणजे रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्यामुळे सध्याच्या भाजप सरकारला एनडीएचे सरकार म्हणू शकतो. १९९० मध्ये धर्मनिरपेक्षता दाखवण्यासाठी रथयात्रेदरम्यान लालकृष्ण अडवानी यांच्या गाडीचा चालक मुस्लिम होता, तशीच काहीशी ही बाब आहे. मोदी आणि शहा यांना रोखता येईल का? तर त्याचे स्पष्ट उत्तर मिळू शकते... नाही. हरियानाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला, जे गैरव्यवहारावरून तुरुंगात आहेत, त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते, ‘हम यहॉं तीर्थयात्रा पर नही आएं... राजनीती सत्ता के लिए होती है!' नवीन भाजप यात उत्तीर्ण झाला आहे. 

बहुतेक पक्ष होते एनडीएच्या छताखाली भूतकाळाचा धांडोळा घेतल्यास आतापर्यंत बहुतेक सर्वच छोटे-छोटे पक्ष एनडीएचे घटक राहिलेले आहेत. आता हेच पाहा, मूळ एनडीएच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री होते. सध्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीएच्या सरकारमध्ये रेल्वे आणि कृषी मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, शरद यादव, रामविलास पासवान हेही एनडीएचे घटक राहिले.

शिवसेनेचे सुरेश प्रभूही मंत्रिमंडळात होते. लोकसभेचे अध्यक्ष जी. एस. बालयोगी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष हे पक्ष एनडीएच्या छत्रछायेत होते. सध्याचा विचार केल्यास नितीशकुमार हे एनडीएचे भागीदार आहेत. निवडणुकीनंतर जरी ते बिहारचे मुख्यमंत्री बनले तरी ती त्यांची अखेरची निवडणूक असेल. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजप लढत आहे. नवीन पटनाईकांना सध्या ओडिशात एकटे सोडले जाईल, कारण आता ते वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. 

शिवसेनेचा कडवा विरोध कायम राहील; मात्र त्यांचे सुरेश प्रभू आता भाजपवासी झाले आहेत. शरद यादव हे एक विरोधातील नेते. त्यांची मुलगी सुभाषिनी या नुकत्याच कॉंग्रेसमध्ये प्रवेशकर्त्या झाल्या आहेत. रामविलास पासवान यांच्या जाण्याने त्यांच्या पक्षाला मोठा झटका बसलेला आहे. त्यांचा मुलगा चिराग किती नेटाने पक्ष सांभाळेल त्यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. चंद्राबाबू नायडूंची ताकद कमी झालेली आहे आणि त्यांना पराभूत करणारे वाय. एस. जगमोहन रेड्डी यांच्या मागे सीबीआय-ईडीचा ससेमिरा कधीही लागू शकतो. मोदी सरकार त्यांच्याकडून फायदा घेईल.

फक्त आठवले तेवढेच सोबत
आपण १९९८ ते २०१४ मध्ये डोकावल्यास भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले होते; मात्र तरीही शिवसेना, लोक जनशक्ती पक्ष, तेलगू देसम, शिरोमणी अकाली दल यांच्यासह अपना दल, राष्ट्रीय लोकतांत्रिक समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष आठवले गट हे सात मित्रपक्ष त्यांच्यासोबत होते. सहा वर्षांनंतर आता भाजपसोबत फक्त आठवले राहिलेले आहेत. त्यातूनच राष्ट्रीय राजकारणात किती मोठे बदल झाले आहेत हे दिसून येत आहे.

मोदी-शहांचे राजकीय सरकार
सध्याचे मोदी-शहा यांचे सरकार हे भारताच्या इतिहासातील सर्वांत राजकीय सरकार असल्याचे म्हणतात. मात्र, त्याबद्दल त्यांना ना खंत ना खेद. ते सध्या तरी सर्वशक्तिमान आहेत.  त्यांची मते कोठेही जाणार नाहीत याची त्यांना खात्री आहे. असेच चित्र यापुढील राजकारणात दिसत राहील. जर ते तुम्हाला आवडले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. हा अश्‍वमेध रोखण्याचे धाडस दाखविल्यास व्हायरल ट्‌विट्‌सचा सामना तुम्हाला करावा लागेल. याबाबत अडवानींना विचारा, ते मुळीच निराश होणार नाहीत. त्यांनीच १९९८ मध्ये भारतीय राजकारणात बदल घडवून आणण्याची मोहीम सुरू केली होती. 

भाजपला चाप बसवणे अवघड
सध्याच्या राजकारणाचा पट पाहता पटनायक, रेड्डी, नितीश या सर्वांना भाजपला चाप बसवणे सध्या तरी शक्‍य नाही हे माहिती आहे. त्यामुळे ते भाजपसोबत दोन हात करत नाहीत; मात्र ते संधीची वाट पाहत आहेत. कदाचित निवडणुकांतून ते स्वतःला जोखतील. मात्र, सध्या तरी त्यांना स्वाभिमान बाजूला ठेवण्याशिवाय पर्याय नाही.

(अनुवाद ः प्रसाद इनामदार)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com