esakal | राजनीतीचा नमो ब्रँड
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

राजनीतीचा नमो ब्रँड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अवघ्या देशाचे राजकारण आज फक्त एका नावाभोवती फिरते ते म्हणजे ‘नरेंद्र मोदी’. राजकीय आघाडीवर एक तर तुम्ही त्यांचे विरोधक असाल किंवा समर्थक पण त्यांना टाळून सत्तेचा सारीपाट मांडता येत नाही. नव्या टोकदार राजकारणाचे ब्रँड बनलेले मोदी मागील २० वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. चोवीस तास राजकारणात सक्रिय राहणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ग्लोबल ते लोकल सर्वच पातळ्यांवर नमो ब्रँडची मोहोर उमटलेली दिसते.

असेही मोदी

 • सलग चारवेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषविले

 • स्वातंत्र्यानंतर जन्मलेले भारताचे पहिले पंतप्रधान

 • रा.स्व.संघाच्या मुशीत तयार झालेले आक्रमक नेतृत्व

 • मुख्यमंत्री असताना ‘ब्रँड गुजरात’चे जगभर प्रमोशन

 • इंदिरा गांधींनंतर विक्रमी परदेश दौरे करणारे पंतप्रधान

 • सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणारे जागतिक नेते

 • योग आणि फिटनेसला महत्त्व देणारे क्रियाशील नेते

महत्त्वाचे निर्णय

 • नोटाबंदी (२०१६)

 • ३७० वे कलम रद्द

 • राममंदिराचे बांधकाम सुरू

 • जीएसटीला प्रारंभ (२०१७)

 • तोंडी तलाकवर बंदी (२०१९)

 • पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक

वादाचा पाठलाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वादाचा जवळचा संबंध आहे. अगदी गुजराचे मुख्यमंत्री झाल्यापासून ते पंतप्रधानपदी विराजमान होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या वादाने त्यांचा नेहमीच पाठलाग केलेला दिसतो.

 • गुजरातमध्ये २००२ साली उसळलेल्या दंगली

 • गुलबर्ग सोसायटी हिंसाचार (२००२)

 • माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांचे आरोप

 • गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांची हत्या (२००३)

 • इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरण (२००४)

 • सोहराबुद्दीन शेख चकमकप्रकरण (२०१०)

 • गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने नाकारलेला व्हिसा

 • ओबामांच्या भारतभेटीदरम्यान घातलेला वीस कोटींचा सूट

 • अभियंता तरुणीवर २००९ मध्ये ठेवण्यात आलेले पाळतप्रकरण

 • शैक्षणिक पात्रता, वैवाहिक स्थिती आणि चहा विक्रीवरून टीकेचे धनी

या पुस्तकांचे लिखाण

 • आंख आ धन्य छे (कवितासंग्रह)

 • आपातकाल में गुजरात

 • एज्युकेशन इज एम्पॉवरमेंट : ए बुक ऑफ कोटेशन्स ऑन एज्युकेशन

 • इंडियाज सिंगापूर स्टोरीज : सिंगापूर लेक्चर

 • एक्झाम वॉरिअर्स

 • एक भारत श्रेष्ठ भारत (मोदींच्या भाषणांचे संकलन - संपादक प्रदीप पंडित)

 • कन्व्हिनियंट ॲक्शन : कंटिन्युटी फॉर चेंज

सर्वाधिक काळ सत्ता केंद्राजवळ

नरेंद्र मोदी

१४ वर्षे - गुजरातचे मुख्यमंत्री

७ वर्षे - देशाच्या पंतप्रधानपदी

पवन चामलिंग - २५ वर्षे सिक्कीमचे मुख्यमंत्री

ज्योती बसू - २४ वर्षे प. बंगालचे मुख्यमंत्री

माणिक सरकार - २० वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्री

नवीन पटनाईक - २० वर्षे ओडिशाचे मुख्यमंत्री

loading image
go to top