Ashadhi Ekadashi spiritual significance
esakal
Why Pandharpur Wari is famous : महाराष्ट्रातील चातुर्मासाची सुरुवात होते वैकुंठाच्या वारीने. सर्वसामान्यांना वैकुंठात स्थान मिळविण्यासाठी आणि परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी दुसरे सोपे साधन नाही. पंढरपूर हे वैकुंठपीठ आहे असे मानले जाते आणि आषाढी एकादशीला येथे जाऊन विठ्ठलापायी लीन होण्यासाठी लाखों वारकरी वारीत सामील होतात. वारीच्या वेळी वारकरी एकमेकाला म्हणत असतात, ‘एक एका लागतील पायी रे’. वारकऱ्यांच्या या प्रचंड समुदायात कोणी छोटा नसतो, कोणी मोठा नसतो. सर्व जण मनात एकीभाव ठेवून वारीला निघतात आणि परमात्म्याचे गुणगान करत विठूरायाच्या चरणी पोचतात. पांडुरंगाचे दर्शन घेताना त्यांच्या मनात वैकुंठाला पोचल्याचा आनंद असतो.