

Environmental NGO Pune
sakal
निसर्गावर मात करण्याच्या आत्मघातकी इर्षेने झपाटलेल्या मानवजातीचा सध्या जगभर वारंवार पराभव होत आहे. कुठे भूस्खलन तर कुठे जलप्रलय, कधी वणवे तर कधी ढगफुटी, कुठे मनुष्य वस्तीत श्वापदे तर कुठे महासाथी, कधी भीषण दुष्काळ तर कधी प्रदूषणाचे सावट यात लक्षावधी जीव जातात, कोट्यवधी बेघर होतात, असंख्य जणांची वाताहत होते. तरीही माणसांची हाव वाढतेच आहे. जणू सगळ्यांना सामूहिक आत्मविनाशाची आस लागली आहे! ‘डेथ विश’ ने ग्रासले आहे!! ढासळत्या पर्यावरणाची ही सगळी चिन्हे असली तरी रोगाचे मूळ सोडून लक्षणांवर चर्चा आणि उपचार करण्यात धन्यता मानली जात आहे.