ढिंग टांग : बाजीगर मैं, बाजीगर..!

नारीसक्ती वंदन बिलावरून माघार घेऊनही ‘बाजीगर’ची राजकीय चाल; पराभवाला विजयात बदलण्याचा नमोजीभाईंचा डाव
ढिंग टांग विशेष: नमोजीभाई आणि मोटाभाईंची 'बाजीगरी'; हरून जिंकणाऱ्यालाच म्हणतात बाजीगर!

ढिंग टांग विशेष: नमोजीभाई आणि मोटाभाईंची 'बाजीगरी'; हरून जिंकणाऱ्यालाच म्हणतात बाजीगर!

Sakal

Updated on

स्थळ : ७, लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही. वेळ : बप्पोरे.

वडाप्रधान नमोजीभाई यांचे निवासस्थान. बंगल्याच्या पायऱ्यांवर गुडघे चोळत चिंताग्रस्त अवस्थेत मोटाभाई बसले आहेत. ‘कुठून बुद्धी झाली, आणि झुणका खाल्ला’ असे अवघडलेले भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. वडाप्रधान नमोजीभाई मात्र एकदम खुश आहेत. समोरच्या हिरवळीवरल्या मोरांना दाणे टाकत आहेत. अधून मधून ‘मजा आवी गया’, ‘एऊ ना कर, आ लई ले’ वगैरे उद्गारांची पखरण चालू आहे. अब आगे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com