फिफ्टी-फिफ्टी! (ढिंग टांग)

british nandy
सोमवार, 20 जून 2016

विक्रमादित्य : बॅब्स!
उधोजी : बोल!
विक्रमादित्य : मी मुख्यमंत्री होईन का हो?
उधोजी : शंभर टक्‍के! का रे?
विक्रमादित्य : कधी?
उधोजी : पुढच्या इलेक्‍शननंतर!
विक्रमादित्य : तुम्ही का नाही झालात मुख्यमंत्री?
उधोजी : मला खुर्चीचा मोह नाही!
विक्रमादित्य : मला तरी कुठे आहे?
उधोजी : पट्टीने मारीन! तुला मुख्यमंत्री व्हायलाच हवं!
विक्रमादित्य : पण मलाही खुर्चीचा मोह नाही!
उधोजी : आजकाल असं चालत नाही बाळा!
विक्रमादित्य : तुम्हाला खुर्चीचा मोह नाही, मग तुम्ही कोण आहात?
उधोजी : मी...मी...रिमोट कंट्रोल आहे!

विक्रमादित्य : बॅब्स!
उधोजी : बोल!
विक्रमादित्य : मी मुख्यमंत्री होईन का हो?
उधोजी : शंभर टक्‍के! का रे?
विक्रमादित्य : कधी?
उधोजी : पुढच्या इलेक्‍शननंतर!
विक्रमादित्य : तुम्ही का नाही झालात मुख्यमंत्री?
उधोजी : मला खुर्चीचा मोह नाही!
विक्रमादित्य : मला तरी कुठे आहे?
उधोजी : पट्टीने मारीन! तुला मुख्यमंत्री व्हायलाच हवं!
विक्रमादित्य : पण मलाही खुर्चीचा मोह नाही!
उधोजी : आजकाल असं चालत नाही बाळा!
विक्रमादित्य : तुम्हाला खुर्चीचा मोह नाही, मग तुम्ही कोण आहात?
उधोजी : मी...मी...रिमोट कंट्रोल आहे!
विक्रमादित्य : रिमोट कंट्रोल? म्हंजे काय बॅब्स!
उधोजी : आपल्या घरच्या टीव्हीचा आहे तसा! म्हंजे लांबून बटणं दाबून च्यानल बदलायचे किंवा आवाज कमी-जास्त करायचा!..वेळ पडली तर म्यूट करायचा!!
विक्रमादित्य : रिमोट कंट्रोल बेभरवशाचा असतो ना बॅब्स?
उधोजी : वाट्टेल ते बोलू नकोस! हा मर्द मावळ्याचा रिमोट कंट्रोल आहे.
विक्रमादित्य : बॅब्स!
उधोजी : बोल!
विक्रमादित्य : तुमचा रिमोट कंट्रोल कोण आहे?
उधोजी : माझा कोणी रिमोट कंट्रोल नाही! मी स्वयंभू आहे!
विक्रमादित्य : आईला बोलावू?
उधोजी : चेचीन!
विक्रमादित्य : रिमोट कंट्रोलची बॅटरी डाऊन झाली की वाट्टेल ते च्यानल लागतात बॅब्स! क्रिकेटची म्याच बघायला जावं, तर कपिल शर्माचा कॉमेडी शो लागतो!!
उधोजी : माझी बॅटरी पहिल्यापासून फुल्ल आहे! अगदी हंड्रेड पर्सेंट!!

विक्रमादित्य : देन प्लीज अनप्लग द चार्जर!
उधोजी : पण तुला मुख्यमंत्री व्हायचंय ना, मग चार्जर अनप्लग करून कसं चालेल?
विक्रमादित्य : आधी तुम्ही व्हा! मग मी होतो!!
उधोजी : मला सत्तेचा मोह नाही! सत्तेचा मोह असता तर मी कधीच मुख्यमंत्री झालो असतो!
विक्रमादित्य : पण मलाही सत्तेचा मोह नाही ना!
उधोजी : असं किती वर्ष चालणार?
विक्रमादित्य : पन्नास वर्षं चाललं ना? आणखी पन्नास वर्ष...फिफ्टी-फिफ्टी!!
उधोजी : सत्तेमुळे शंभर टक्‍के समाजकारण होतं! मुंबईत बघितलंस ना किती प्रचंड समाजकारण झालंय आपल्यामुळे! आणि सत्ता नसती तर मराठवाड्यात शिवजलक्रांती कशी झाली असती? ३३ हज्जार शेतकऱ्यांना मदतवाटप कसं झालं असतं? सामूहिक लग्नं कशी लागली असती? तात्पर्य एवढंच की तू मुख्यमंत्री हो!
विक्रमादित्य : बॅब्स!
उधोजी : बोल!
विक्रमादित्य : मी मुख्यमंत्री कधी होणार?
उधोजी : पुढच्या इलेक्‍शननंतर!
विक्रमादित्य : नक्‍की?
उधोजी : हो...तसं जवळपास नक्‍कीच! मला आपलं भविष्य लख्ख दिसतंय!
विक्रमादित्य : एचडीमध्ये दिसतंय? फोर के?
उधोजी : अलबत! लख्ख दिसतंय एवढं पुरेसं नाही का? एचडी काय, फोरके काय! छे!!
विक्रमादित्य : बॅब्स!
उधोजी : बोल!
विक्रमादित्य : पन्नास वर्ष पूर्ण झाली ना आपल्याला?
उधोजी : हं!
विक्रमादित्य : गोरेगावला कार्यक्रम आहे ना?
उधोजी : हं!
विक्रमादित्य : आयटेम साँग कोण सादर करणारे?
उधोजी : ही पट्टी बघितलीस हातातली?
विक्रमादित्य : बॅब्स!
उधोजी : एक शब्द बोलू नकोस!
- ब्रिटिश नंदी

Web Title: british nandy dhing tang politics