
वर्षानुवर्षे आपण श्रीकृष्णजन्म साजरा करतो आहोत, यापुढेही करत राहू... पण फक्त तेवढेच पुरेसे नाही. श्रीकृष्णांची कृपा हवी असेल तर त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचे आचरण करण्याशिवाय पर्याय नाही. श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास व चिंतन करून ब्रह्मविद्येचा शोध घेण्याने श्रीकृष्णांची मर्जी संपादन करून घेता येते. श्रीकृष्णांनी सांगितल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणे हाच खरा श्रीकृष्णजयंतीचा उत्सव होय.