हिंदी महासागरातील धुमश्चक्री

चीनने हिंदी महासागरात भारताच्या अवतीभवती असणाऱ्या सर्व देशांना अंकित करून भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर कोलंबो बंदरात चीन व भारताची युद्धनौका समोरासमोर आल्याची घटना नुकतीच घडली. चीनच्या इराद्यांविषषी चर्चा होणे त्यामुळे स्वाभाविक आहे.
हिंदी महासागरातील धुमश्चक्री
हिंदी महासागरातील धुमश्चक्रीsakal
Updated on

-डॉ. राजेश खरात

चीनने हिंदी महासागरात भारताच्या अवतीभवती असणाऱ्या सर्व देशांना अंकित करून भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर कोलंबो बंदरात चीन व भारताची युद्धनौका समोरासमोर आल्याची घटना नुकतीच घडली. चीनच्या इराद्यांविषषी चर्चा होणे त्यामुळे स्वाभाविक आहे.

भा रतीय नौदलाचे ‘मुंबई’ नामक जहाज दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या नौदलाकडून मोठ्या दिमाखात सन्मान घेऊन कोलंबो बंदरातून भारतीय हद्दीत परतले. २६ ऑगस्ट रोजी चीनच्या तीन युद्धनौका आणि भारताची क्षेपणास्त्रविनाशक ‘आयएनएस’ कोलंबो बंदरावर एकाच वेळी दाखल झाल्या होत्या. चीनच्या तीन युद्धनौकांत विनाशक ‘हेफेई’चा समावेश होता. जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी तितक्याच तत्परतेने सेवा देऊ शकतील, अशी ही चीनची जहाजे. हा केवळ योगायोग होता, अशी भूमिका दोन्ही देशांनी घेतली. वादाची ठिणगी पडू नये म्हणून मुत्सद्देगिरीचा हा एक भाग असू शकतो. कोलंबो बंदरात या युद्धनौकांचे येण्याचे प्रयोजनदेखील एकच, म्हणजे श्रीलंकेसोबत नाविक-युद्धनीतीचे प्रशिक्षण व सराव करणे हे होते. या प्रशिक्षण-सरावात नवीन काही नसले तरी, एकाच वेळी चीन व भारत यांच्या युद्धनौका समोरासमोर येणे हे जरा धक्कादायकच म्हणावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com