विद्यार्थिसंख्येला कोरोनाचे ग्रहण

student
student

पाश्चिमात्य विद्यापीठांत प्रवेश घेण्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांची दरवर्षी रीघ लागलेली असते. पण यंदा ‘कोरोना’ने ही साखळी तोडली आहे. त्यामुळे विकसित देशांत `कोरोना`चा सर्वात मोठा फटका बसलाय तो शिक्षण क्षेत्राला.

तुमच्या मते कोरोनाचा कोणत्या क्षेत्राला सर्वात मोठा फटका बसला असेल? रिटेल, वाहतूक, बांधकाम की केटरिंग? नाही तुम्ही चुकताय. `बीबीसी`च्या मते सर्वात मोठा फटका बसलाय तो शिक्षण क्षेत्राला. प्रगत देशांत शिक्षणातून प्रचंड आर्थिक उलाढाल होते. शिक्षणाचे सध्याचे मॉडेल विकसित होवून जवळपास शंभराहून जास्त वर्षे झाली. त्यातून वेगवेगळ्या देशांतील हजारो मुले अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलियात शिकायला येतात व राहतात. जगभरात जसजसा मध्यमवर्ग उदयाला आला, तसे पाश्चिमात्य विद्यापीठांत परदेशी मुलांचे प्रमाण वाढू लागले. त्यातून प्रचंड संपत्तीचा ओघ सुरु झाला. ‘कोरोना’ने ही सारी साखळी तोडली आहे. घरी गेलेली मुले लवकर परतणार नाहीत. तसेच बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाईन होत आहेत. प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठाने पुढील वर्षभर सारे अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविण्याचे जाहीर केले आहे. ‘कोरोना’चे संकट असेच चालू राहिले तर खरा फटका प्रगत देशांतील विद्यापीठांना व शिक्षणाभोवती बहरलेल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे.

अनेक विकसनशील देशांत आजही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत नाही. तेथील पालकांकडे मुबलक पैसे आहेत. त्यामुळे ते मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवतात. पण आता चित्र बदलणार आहे. या श्रीमंत पालकांची मुले आता कदाचित ऑनलाईन शिक्षण घेतील. गेल्या वर्षी एकट्या अमेरिकेत तीन लाख साठ हजार चिनी विद्यार्थी शिकत होते. परदेशी विद्यार्थ्यांच्या मायमातून गेल्या वर्षी अमेरिकी अर्थव्यवस्थेत तब्बल ४५ अब्ज डॉलरची भर पडली. यावरून शिक्षणाचे महत्व लक्षात येते.
 
पैशांचा ओघ आटणार
‘इकॉनॉमिस्ट’ने यावर विशेषांक काढला आहे. त्यांच्या मते ‘कोरोना’मुळे सर्व ख्यातनाम विद्यापीठांची अवस्था बिकट झाली आहे. एकीकडे परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळणारा महसूल आटला आहे, तर `कोरोना`चा फैलाव रोखण्यासाठी शिक्षण पद्धतीत व कॅंम्पसच्या रचनेत बदल करावा लागत आहे. १९९५नंतर विकसनशील देशातील श्रीमंत वर्गातील मुलांची पाश्चिमात्य देशात शिकण्यासाठी रीघ लागली. अमेरिकेचा विचार करता उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण १६ टक्क्यांवरून ३८ टक्के झाले. ऑस्ट्रेलियातील चार प्रमुख विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांवर अवलंबून आहेत. मात्र विकसनशील देशांत अर्थव्यवस्थेला फटका बसल्याने शिक्षणासाठी जास्त पैसे मोजण्याची सध्या कोणाची तयारी नाही. अमेरिकेतील बोस्टन, ब्रिटनमील रिडींग, ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स या विद्यापीठांनी पायाभूत सुविधासांठी लाखो डॉलरची गुंतवणूक केली आहे. या विद्यापीठांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन येथील विद्यांपीठापुढे गंभीर समस्या आहेत. याच ठिकाणी जगातील सर्वाधिक परदेशी मुले शिकतात. २०००मध्ये येथे असेलली २० लाख परदेशी विद्यार्थीसंख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. या मुलांची फीदेखील अफाट असते. उदा. कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात सायन्सच्या डिग्रीसाठीची स्थानिक मुलाला अडीच हजार डॉलर फी आहे. पण याच कोर्ससाठी परदेशी मुलाला चक्क ४५ हजार डॉलर मोजावे लागतात. त्यामुळे परेशातून विद्यांपीठाकडे येणाऱ्या पैशांचा ओघ आटणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता शिकस्त सुरू आहे. काहींनी चीन व भारतीय मुलांना आणण्यासाठी खास चार्टर्ड विमानांची सोय करण्याची तयारी चालविली आहे. अमेरिकतील दहा विद्यापीठांनी एकत्रित येवून सहा लाख मुलांना ऑनलाईन कोर्सची संधी निर्माण केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थीसंख्येत २५ टक्के घट
‘वॉशिग्टन पोस्ट’च्या मते ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका अमेरिकी विद्यापीठांना बसेल. गेल्या वर्षी अमेरिकेत दहा लाख परदेशी मुले शिकत होती. मात्र मार्चपासून यातील दहा टक्के मुले पुन्हा येथे परतली आहेत. तुलनेने ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियाची स्थिती बरी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत २५ टक्के घट होण्याची चिन्हे आहेत. यामुळे विद्यापीठांना तब्बल २३ अब्ज डॉलरचा फटका बसण्याची भीती आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या जोरावर २०१९ मध्ये अमेरिकी शाळा व विद्यापीठांनी ४५ अब्ज डॉलरची उलाढाल केली होती. तर त्यातून पाच लाख रोजगार निर्माण झाले होते. यंदा तसे घडणार नाही. प्रामुख्याने चीन व भारतातून सर्वाधिक विद्यार्थी अमेरिकेत येतात. ट्रम्प प्रशासनाने या देशांसाठीच व्हिसा नियम कडक केल्याने विपरित परिणाम होणार आहे. त्याची झळ आता बसू लागली आहे. पण संकटातही संधी दडलेली असते. भारतातील विद्यापीठांनी त्याकडे या दृष्टीने पहायला हवे. यंदा परदेशात शिकायला जाणाऱ्यांचा ओघ आटणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकृष्ट केल्यास त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. अर्थात त्यासाठी येथील विद्यापीठांना शिक्षणपद्धतीत मूलभूत बदल घडवावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com