"कोरोना'नंतरचे करिअर 

Career-after-Corona
Career-after-Corona

लॉकडाऊननंतर अनेकांचे रोजगार गेले असले तरी आता हळूहळू का होईना, अर्थचक्र रुळावर येऊ पाहात आहे. सरकारबरोबरच खासगी क्षेत्रातही अनुभवी तसेच नवोदितांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या नव्या रोजगार संधींना व्यवहार्य व कल्पक संधींची साथ मिळत आहे. काही निवडक कंपन्यांमधील कोरोना काळात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांनी "बाऊन्स बॅक लिस्ट' नावाची उमेदवार कर्मचाऱ्यांची सूची तयार केली आहे. या उमेदवार यादीमध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयातील प्रशिक्षित व अनुभवी उमेदवारांचा समावेश आहे. या सूचीचा उपयोग सध्या अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज असणाऱ्या कंपन्यांना होत आहे. "टीमलीज"नुसार आगामी तीन महिन्यांत राष्ट्रीय पातळीवर विशेषत: आरोग्य सेवा व वैद्यकीय क्षेत्र, ई-कॉमर्स, शिक्षण क्षेत्र इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारसंधी निर्माण होणार असून त्यांचा फायदा नवागत व अनुभवी अशा उभय क्षेत्रातील उमेदवारांना होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सर्वेक्षणात नमूद केल्यानुसार, या वर्षी एप्रिल-जून कालावधीत सुमारे 11 टक्के असणारे रोजगारभरतीचे प्रमाण जुलै-सप्टेंबर दरम्यान 18 टक्‍क्‍यांवर जाईल. महानगरांच्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या अपेक्षित आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2020पर्यंत बंगळुरूमध्ये नव्याने 21 टक्के, राजधानी दिल्लीत 21टक्के, हैदराबाद 15 टक्के, चंदिगढ 14 टक्के, कोलकाता 12 टक्के व मुंबईमध्ये 13 टक्के नव्या रोजगारांची टक्केवारी असणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या सहामाहीत नव्या रोजगारांच्या संधी आणि त्याची अपेक्षित टक्केवारी कोरोनापूर्व काळातील प्रचलित व परंपरागत स्वरुपातील नव्या रोजगारांच्या तुलनेत कमी आहेच. पण, "लॉकडाऊन'च्या पार्श्वभूमीवर नव्याने समोर आलेले रोजगार संधीविषयक चित्र व टक्केवारी "टीमलीज'चे कार्यकारी उपाध्यक्ष ऋतूपर्ण चक्रवर्ती यांना मात्र आशादायी वाटते "एचसीएल' कंपनीने कोरोनानंतर आपल्या उद्योगाला नव्याने चालना देण्यासाठी नव्याने उत्तीर्ण झालेल्या 15 उमेदवारांची निवड करण्यासाठी तयारी सुरु केली होती. गेल्या वर्षी "एचसीएल' कंपनीने अशा प्रकारे नऊ हजार उमेदवार नव्याने नियुक्त केले होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com